कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहरात भटक्या कुत्र्यांच्या टोक्यामुळे नागरिकांचे जीवित धोक्यात आल्याच्या अनेक घटना घडत आहेत. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी आढळणारी ही टळकी लहान मुलांच्या वर धावून जातात मुला-मुलींच्या जीवितास धोका निर्माण करतात शिवाय सकाळी फिरायला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनाही ते अत्यंत त्रासदायक ठरत आहेत. काही आक्रमक कुत्री मोटर सायकलच्या मागे धावत जातात. त्यामुळे अपघाताचे प्रसंग सुद्धा उडवत आहेत. प्रत्येक तालुक्यात किमान 15 ते 20 कृती असतात.
या कुत्र्यांचा एक तर बंदोबस्त करावा किंवा त्यांचे निर्बीजीकरण करावे या मागणीसाठी नागरिक आक्रमक झाल्याचे दिसून येते. शहरात अंदाजे चार पाचसे कुत्री असावीत असा अंदाज बांधण्यात आला आहे.
नगरपालिका यांचा बंदोबस्त त्वरित करत नसेल तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे नागरिक शिष्टमंडळाने नगरपालिका प्रशासनास सांगितले आहे. मुख्याधिकारी अतिश वाळुंज यावेळी उपस्थित होते.
शिष्टमंडळात खालील नागरिकांचा समावेश होता. अमर सनगर शिवाजी चौगुले, सर्जेराव भाट,आनंदा रामाने , तानाजी भराडे, ओंकार पोद्दार ,संदीप भारमल प्रफुल्ल कांबळे इत्यादी सह ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी पालक.
----------------------------