कोल्हापूर न्यूज / वि. रा.भोसले
शरद पवार यांनीच मराठ्यांना पायचीत (LBW) केले आहे.
हे विधान मुद्दाम करण्याचं कारण युवकांना हीच भाषा चांगली समजते. क्रिकेटच्याच भाषेत हे समजावून घेऊया. जरांगे जे म्हणतात ते सन १८८१,१८८४ व १९०९ मधील बॉम्बे गॅझेट व हैद्राबाद गॅझेट प्रमाणे मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसी प्रमाणे आरक्षण द्यावे.ही मागणी म्हणजे आकाशातील तो चंद्र आणून द्या असे म्हणण्यासारखे आहे.श्री रामाने अशी मागणी बाल्यावस्थेत केली होती. तेंव्हा कौशल्याने बाळाला परातीतील पाण्यात चंद्रबिंब दाखवले.
एक तर ही गॅझेट्स स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. त्यावेळी महाराष्ट्र निर्माण झाला नव्हता.या गॅझेट प्रमाणे आरक्षण देणे राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही.ते सोडून देऊ.आता थोडे पुढे जाऊ.१९९४ ला मंडल आयोग आला.त्यावेळी त्या आयोगाने राज्यसरकारकडे जाती निहाय सर्वेक्षण मागितले.शरद पवार त्यावेळी मुख्य मंत्री होते.निर्णय त्यांच्या हाती होता.म्हणजे ते पंच (अंपायर )होते. त्यांनी मराठा वगळून सर्व उपजाती दिल्या.मराठा हे क्षत्रिय व सरंजामी असल्याने त्यांना आरक्षणाची गरज नाही असे त्यांनी निर्णय दिला. त्याचे मुख्य कारण असे की जर मराठ्यांना आरक्षण दिले तर ते सत्तेत सुद्धा लागू पडेल.लोकसंख्येने जास्त असलेले मराठे सत्तेत आले तर आपली खुर्ची खिळखिळी होईल याची त्यांना त्यावेळी भीती वाटत असावी.मराठे आऊट होणारे नाहीत.ना त्रिफळा(बोल्ड) ना झेल(, कॉट आऊट). तेव्हां त्यांना पायचीत करणे याशिवाय पर्याय नाही.हा निर्णय सोपा असतो व त्यावर अपील पण अवघड असते.झाले.मराठे इथेच आऊट झाले.
जरांगेचे हे आंदोलन कांहीं पहिले नाही.प्रत्येक वेळी मराठा आंदोलकांनी शरद पवार यांची छी थुं केली आहे. मुंबईत आझाद मैदानावर सुप्रिया सुळे जरांगेना भेटून गेल्या तेंव्हा त्यांच्या गाडीवर आंदोलकांनी दगड फेकले.त्यामुळे सुप्रिया सुळें रहातात त्या सिल्व्हर ओक ला पोलिस संरक्षण द्यावे लागले आहे.मराठ्यांचे आरक्षण अवघड का झाले त्याचे स्पष्टीकरण आरक्षण अभ्यासक डॉ.बाळासाहेब सराटे यांनी चांगले स्पष्ट केले आहे. पूर्वी एकूण आरक्षण ३४टक्के होते.त्यात ओबीसी फक्त १९ टक्के होते. ओबीसी त अनेक उपजाती घुसडून ते २७ टक्के केले आहे. माळी आणि तेली या उपजाती भुजबळ आल्यानंतर घुसडल्या आहेत.त्यासाठी मूळ जी आर मध्ये फक्त एक वाक्य नवीन घालून हा बदल केला आहे.म्हणजे मराठ्यांना पुन्हा धतूरा .
मराठा समाज महाराष्ट्रात ४७ टक्के आहे.त्यात सरंजामी ९६कुळी वाले आणि मराठवाड्यातील अनेक प्रकारचे मराठा बांधव आले.या बांधवांचेच जास्त हाल आहेत.मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचे असेल तर शिंदे समितीला मुदत वाढ देऊन ओबीसी दाखले मिळविले पाहिजेत.मराठवाड्यात आधी ते काम हाती घेतले पाहिजे.मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती तरी द्या. बिचारी पोरे जमिनी विकून शैक्षणिक फी भरतात.त्यांना गिळायला मराठ्यांचेच बोके बसलेले असतात.
जरांगे उपोषणाने मार्ग काढू इच्छितात.त्यांच्यात आणि अण्णा हजारे यांच्यात फरक आहे.एकेरी आणि उर्मट भाषा ना कधि हजारेंनी वापरली होती ना कधि महात्मा गांधींनी वारली होती.त्यांच्या उपोषणात इतकी ताकद होती की सरकारचे सिंहासन हादरले होते.देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत होता..याच मराठ्यांनी ५१ मूक मोर्चे काढून ताकद दाखवली होती.सरकार उलथून टाकतो,खुर्चीवरून खाली खेचतो ही भाषा उपोषणाच्या दुधात विरजण टाकणारी आहे.मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळायला पाहिजे असा मार्ग महाराष्ट्र शासनाने काढावा हीच मनोमन इच्छा.
एक मराठा कोटी मराठा.
------------------------------

