मुंबई : सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना खडसावले आहे. यावेळी बोलताना जरांगे यांनी म्हटले की सन्मान दिला नाही तर नेते आंदोलनस्थळी यायला घाबरतील. सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानाने पाठवा, ही जबाबदारी तुमच्यावर आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीवर देखील भाष्य केले, ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाचा सरसकटला विरोध असण्याचे कारण नाही. पण तसे असले तरी मराठा कुणबी ही उपजात आहे. २०१२ च्या कायद्यानुसार मराठा आणि कुणबी पोटजात म्हणून घ्या सरसकट म्हणायची गरज नाही. आम्हाला ओबीसी अरक्षणात जण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आम्ही ओबीसीमध्ये जाणार म्हणजे जाणार, असे म्हणत मनोज जरांगे यांनी निर्धार बोलून दाखवला.

