कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे बंद घरांमध्ये चोरी झाल्याचे आज सकाळी उघडकीस आले. या चोरीमध्ये मौल्यवान वस्तू सह नंदकिशोर स्मार्त यांच्या घरामधील डीव्हीआर चोरट्यानी लंपास केल्याची माहिती मिळत आहे .तसेच त्यांच्या शेजारी राहणारे डॉ. राजन नाईक यांच्या घरी देखील चोरीचा प्रयत्न झाला .मात्र या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काही लागले नाही.
सकाळी नागरिकांनी नाईक आणि शेजारी परगावी गेलेल्या स्मार्ट यांना फोन करून बोलून घेतल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला .काही महिन्यापूर्वी सोन्याचे दागिने आणि पैसे चोरट्याने लंपास केले होते . तिसऱ्यांदा शहरांमध्ये धाडसी चोरी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे .नागरिकांनी पोलीस यंत्रणेवर संताप व्यक्त केला आहे . एकाच परिसरामध्ये महिनाभराच्या आत पुन्हा चोरी झाल्याने चोरटे चांगलेच सरावले आहेत असे म्हणून नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
महालक्ष्मी नगर सारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये cctv नसल्यामुळे तपासासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे .पुढील तपास मुरगूड शहर पोलीस करत आहेत.लवकर चोरट्यांना ताब्यात घेतले पाहिजे कारण, सण असल्याने बरेच लोक कुलूप लाऊन गावी गेले असण्याची शक्यता आहे.गस्त सुद्धा गरजेची आहे असे मत सुद्धा कांहीं नागरिकांनी व्यक्त केले.
--------------------------




