कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची 87 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा बँकेचे चेअरमन हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सर्वसाधारण सभेत राज्यशासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, व्हा.चेअरमन राजूबाबा आवळे, माजी खासदार संजय मंडलिक व निवेदिता माने , माजी आमदार संजयबाबा घाटगे ,कार्यकारी संचालक जी. एम. शिंदे यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ, जिल्हाभरातील सभासद,विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------