मुरगुड चा चेहरा मोहरा बदलणार - नामदार हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 

                



               कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


    मुरगुड चा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असून प्रलंबित असणाऱ्या विकास कामाच्या माध्यमातून मुरगुड चा चेहरा मोहराच बदलून टाकू असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी केले. 


मुरगुड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच मुरगुड येथे संपन्न झाला, या मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील होते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार प्रमुख उपस्थित होते.


      रणजितसिंह पाटील म्हणाले, नामदार मुश्रीफ यांनी मुरगुडच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी नगरपालिकेची सत्ता त्यांच्याकडे देणे गरजेचे आहे.यावेळी माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला खूप चांगले भवितव्य असून अनेक जण राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. 

   

यावेळी मुरगुडचे माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रद्युमन पवार, किसन मोरे, साताप्पा खाडे, रणजीत मेंडके, गणेश मांगोरे, किसन वाईंगडे, प्रशांत येरुडकर, संदीप पाटील, प्रवीण निकम, रामचंद्र मोरबाळे, सिद्धाप्पा खतकर यांचा प्रवेश झाला.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, गोकुळचे माजी चेअरमन रणजीतदादा पाटील, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, तालुकाध्यक्ष विकासराव पाटील, दत्ता पाटील केनवडेकर, विश्वजीत पाटील, पद्मसिंह पाटील, शहराध्यक्ष रणजीत सूर्यवंशी, बजरंग सोनुले, नामदेव भादिंगरे,  दिगंबर परीट, चंद्रकांत जाधव, राजू आमटे, डॉ. सुनील चौगुले, राजाराम गोधडे, चाचा चौगुले, सुनील सूर्यवंशी, रणजीत मगदूम, अमर सणगर, महंतेश पाटील, अमर देवळे, मंजुबादेवी पाटील, तसलीम जमादार, गौराबाई सोनुले, फुलाबाई कांबळे, माया चौगले, नम्रता भादिगरे, संगीता चौगले यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी तर आभार नंदकिशोर खराडे यांनी मानले.

      


             --------------------------