कोल्हापूर न्यूज नेटवर्क
लक्ष्मी पूजेचे ऊस कचरा गाडीत न टाकता गोशाळेला अर्पण करावेत असे आवाहन मुरगूड येथील गो प्रेमी कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना केले होते. त्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळाला व तीन टनाहून अधिक ऊस स्वयंसेवकांनी गोळा केला.सर्व रसाळ ऊस गो शाळांना अर्पण करण्यात आला.
गायीला महाराष्ट्र शासनाने राज्य मान्यता दिली आहे. शिवाय गाईला घास भरविणे हे पुण्याई चे मानले जाते.
दीपावली ची सुरुवात बसू वारस म्हणजे गो पूजनाने होते.हा सण जसा आनंदाचा आहे तसा पुण्य संचयाचा आहे असे मानले जाते.
हा उपक्रम पर्यावरणपूरक सुध्दा आहे असे ही मानले गेले.
यात योगदान असलेल्या यूवकांची नावे याप्रमाणे.
सर्जेराव भाट,तानाजी भराडे,जगदीश गुरव, धनंजय सूर्यवंशी,प्रकाश पारिषवाड, ओंकार पोतदार, अमर सुतार सुभाष अनावकर,अमोल मेटकर,संकेत शहा,बाळासाहेब भराडे,आकाश भाट,विनायक मेटकर, आनंदा रामाणे,रघुनाथ बोडके,प्रफुल्ल कांबळे,शिवाजी चौगुले,इत्यादी
--------------------

