कोल्हापूर न्यूज नेटवर्क
माणसांनी आयुष्यात प्रेम मिळवावे तेच आयुष्यभर पुरते . व्यवसाय असो वा नोकरी आपण कुठेही असलात तरी जन्मभूमीच्या मातीशी असलेली नाळ तुटता कामा नये.व्यवसाय ,नोकरी अथवा सामाजिक कार्य असो त्यात वेडाने झपाटलेल्या व्यक्तीचं जीवनात यशस्वी होतात . असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर कै. फिरंगोजी शिंदे शिक्षण संस्था गिरगावचे अध्यक्ष प्रताप (बापू) कोंडेकर यांनी केले .
दौलतवाडी (ता-कागल) येथील गुरुवर्य कै. ग.बा.सावंत मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टचे उदघाटन, ट्रस्टच्या मळगी व स्टोअर रूमचे लोकार्पण व गुरुवर्य कै.ग.बा.सावंत यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते . यावेळी ट्रस्टच्या वतीने पहिला जीवनगौरव पुरस्कार पी.जी. पाटील गुरुजींना प्रदान करण्यात आला . तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी ट्रस्टचे उद्घाटन लक्ष्मी नारायण पतसंस्थेचे संचालक पुंडलिक डाफळे यांच्या हस्ते, गुरुवर्य ग. बा. सावंत यांच्या पुतळ्याचा अनावरण राष्ट्रपती पारितोषिक विजेते शिक्षक पी.जी.पाटील (मांगोली, ता. राधानगरी) यांच्या हस्ते झाले .
यावेळी माजी मुख्याध्यापक शिवाजीराव सावंत, नेताजीराव सावंत, गोकूळचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील , मुरगूडच्या उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले, कोजिमारी पतसंस्थेचे शिक्षक नेते दादा लाड, मनीषा सावंत, चारू पाटणे , सौरभ कल्याणी यांची प्रमुख उपस्थिती होती .
यावेळी ट्रस्टचे संस्थापक ,अध्यक्ष व एससीजी डिझाइन सोल्युशन्स बहुराष्ट्रीय कंपनीचे संचालक संग्रामसिंह सावंत म्हणाले , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवन आमुलाग्र बदलण्याचे कार्य ग बा सावंत यांनी हयातभर केले . तोच कार्याचा वैचारिक वारसा निरंतर ठेवण्यासाठीच या ट्रस्टची उभारणी केली आहे .
या कार्यक्रमास सुशील बरगे, कर्नल वेसवेकर ,उत्तम कांबळे , विक्रम नलवडे ,सरपंच शितल जाधव ,नगरसेविका गीतांजली आंगज , सविता गोधडे, माजी सरपंच सर्जेराव कानडे , नगरसेवक सुनील रणवरे , राहुल शिंदे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी ,आजी माजी शिक्षक ,विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत , प्रास्ताविक संग्रामसिंह सावंत यांनी केले . टोमॅटो एफएमचे जॉकी विश्वराज जोशी यांनी सुत्रसंचालन केले . तर आभार शिवाजी सावंत ( गारगोटी ) यांनी मानले .
---------------------------


