कोल्हापूर न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा मार्फत (लाल परी ) मुरगूड बस स्थानकावर प्रवासी वर्गासाठी तिळगुळ वाटप कार्यक्रम ठेवण्यात आला होता. रथ सप्तमी चा मुहूर्त साधून राज्यातील सन 2003 च्या पहिल्या महिला कंडक्टर सौं.. मीना महिंद पोतदार यांच्या हस्ते बस पूजन करण्यात आले. त्या सद्या बिद्री येथील ज्युनिअर कॉलेज वर प्राध्यापक आहेत.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी स्थानक प्रमुख बाळासाहेब परीट हे होते. पत्रकार राजू चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.
लाल परी संगे तीर्थाटन या योजनेंतर्गत महिला व जेष्ठ नागरिकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादा बद्दल त्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात गुलाब पुष्प व तिळगुळ देऊन सन्मान करण्यात आला व ऋण व्यक्त करण्यात आले.
अंगारंकी संकष्टी ला तेरा बसेस भरून गणपतीपुळे येथे गेल्या होत्या.तशीच योजना अक्कलकोट पंढरपूर, तुळजापूर व अयोध्या या तीर्थासाठी आखण्यात आली असल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात. आले. अयोध्या नगरीचा प्रवास परती सह अंदाजे बारा दिवसांचा असेल. महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत एस टी ची महिला व जेष्ठ नागरिकांसाठी साठी नेहमीची सवलत योजना असेल. अयोध्येत निवास व्यवस्था उत्तर प्रदेश सरकार मार्फत मोफत असेल.
या वेळी प्राचार्य वि. रा भोसले, माजी उपनगराध्यक्ष किरण गव्हाणकर,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शहा, मुरगूड बँकेचे संचालक विठ्ठलराव मेटकर, निवृत्त स्थानक प्रमुख लोकरे, अमृत प्रवासी मोहिते गुरुजी ई. यांचा सत्कार करण्यात आला.
लाल परी मार्फत प्रवासी वर्गाला सुरक्षित व आरामदायक प्रवासाच्या शुभेच्छा देऊन स्थानकातील बसेस मार्गस्थ करण्यात. आल्या.
-------------------------

