मुरगूडच्या एम जे लकी इंटरनॅशनल स्कूलला कागल तालुक्याचे संगणक परीक्षा केंद्र म्हणून मंजुरी.

Kolhapur news
By -

 

               

     

          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


     महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मुरगूड येथील एम जे लकी इंटरनॅशनल स्कूल ला संगणक टायपिंग चे कागल तालुक्याचे अधिकृत परीक्षा केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.


 ज्ञानप्रबोधिनीचे अध्यक्ष व्ही आर भोसले यांचे हस्ते आणि एम जे इंटरनॅशनल चेअरमन धोंडीराम मकानदार यांच्या उपस्थितीत पूजन करून व फित कापून या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले .तालुक्यातील ४०० संगणक परीक्षार्थीं या केंद्रावर परीक्षा देतील.५ ते १० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या परीक्षा केंद्राचे  केंद्रप्रमुख म्हणून एम जे च्या प्राचार्या जस्मिन जमादार या काम पाहतील.तसेच पर्यवेक्षक म्हणून सौ. ऋतुजा मोरबाळे,टेक्निशियन म्हणून रोहन पाटील,बायोमेट्रिक अटेंडंट चंद्रसेन घोरपडे, जि.प.,प्रतिनिधी टेक्निकल असिस्टंट अजित पाटील यांनी काम पाहिले.




                -------------------------------