अंगारकी संकष्टी साठी मुरगूडहून तब्बल ७ बसेस गणपतीपुळेला रवाना

Kolhapur news
By -

 

                    





            कोल्हापूर न्यूज नेटवर्क   


        एस टी संगे तीर्थाटन या योजनेअंतर्गत तब्बल सात एसटी बसेस गणपतीपुळे येथील गणेश दर्शनासाठी आज रवाना झाल्या. जेष्ठ नागरिक व महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत आणि अमृत योजनेंतर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास सवलत या  धोरणामुळे भाविकांना मंगल दिनी गणेश दर्शनाचा लाभ मिळत असल्याने त्यांनी एस टी महामंडळास दुवा दिला.लाल परी आमची सखी सोयरी असा अभिप्राय सुद्धा नूतन नगरसेविका सौ.सुजाता जगन्नाथ पुजारी यांनी दिला.सौ.सविता चौगुले (अध्यापिका) यांनी सुद्धा एस टी च्या या सेवेबद्दल भाविकांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त केली.


रविवार दिनांक ४जानेवारी ला ४ बसेस पुळ्या ला गेल्या होत्या त्या यात्रेतील महिलांनी सांगितले की पहिल्यांदाच आम्हीं समुद्र बाघितला.लई भारी वाटलं अशीही प्रतिक्रिया दिली.


   आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून एस टी प्रशासनाने ज्येष्ठ पत्रकार वि. रा.भोसले ,शाम.पाटील,मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष रवि शिंदे,उपाध्यक्ष राजू चव्हाण यांना बस पूजनाचा मान देऊन सन्मानित केले.


  एस टी चे स्थानक प्रमुख सागर पाटील,वाहतूक नियंत्रक दिलीप घाटगे व बाळासो परीट यांनी ही प्रवासी भाविकांचे स्वागत करून संकष्टीच्या शुभेच्छा दिल्या.


  प्रथितयश व्यापारी प्रशांत शहा यांनी या सुविधा देण्यासाठी मार्ग परिवहनचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांची संकल्पना व योगदान असल्याचे आपल्या मनोगतात विशद केले.अक्कलकोट ,पंढरपूर यात्रेची सुविधा मिळावी अशी भाविकांची मागणी त्यांनी मांडली.


       


 ----------------------------------