कोल्हापूर न्यूज नेटवर्क
कागल तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक मंत्री हसन मुश्रीफ व शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांची युती ज्यांच्या मध्यस्थीने झाली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे. फक्त युती झाली नाही तर या युतीचा सकारात्मक परिणाम नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडणुकांमध्ये दिसून आला आणि या युतीला घवघवीत यश मिळाल्यामुळे कागल मध्ये जनतेने या युतीला स्वीकारले असल्याचे सिद्ध झाले.
त्यामुळे या युतीचे शिल्पकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनीही निवडणुकीमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन करून भविष्यातील विकास कामांसाठी कागलकरांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे आश्वासन दिले.
----------------------

