नवी दिल्ली :राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांची दिल्लीतील उपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीदरम्यान झालेल्या बैठका आणि अनौपचारिक चर्चांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या शक्यतांना वेग आला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतरचे राजकीय समीकरणे राज्याच्या सत्तासमीकरणावर परिणाम करणारी ठरली होती.
मात्र बदलत्या राजकीय परिस्थितीत दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेकडे पाहिले जात आहे. दिल्लीतील हालचालींमुळे या चर्चांना नवे बळ मिळाले आहे.विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाच्या भविष्यासंदर्भात आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी काही महत्त्वाच्या बैठका पार पडल्या.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांना पुन्हा एकसंघ पक्ष पाहण्याची अपेक्षा असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, अधिकृत पातळीवर कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नसली तरी दिल्लीतील या हालचालींमुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काही दिवसांत या घडामोडींवर अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
----------------------------

