'राष्ट्रवादी'वर दिल्लीत मोठ्या हालचाली

Kolhapur news
By -

 


      


नवी दिल्ली : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी दोन्ही नेत्यांशी स्वतंत्रपणे अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा केली. या चर्चेचा तपशील अद्याप समोर आला नाही. पण ही चर्चा महाराष्ट्रातील राजकीय घटनाक्रम तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या भोवती फिरती असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे पुढील काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठे फेरबदल दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.