कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड येथील श्रीराम मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रामनवमी भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी सकाळी महाअभिषेक होऊन महाआरती झाली. त्यानंतर ह भ प श्रीरंग पाटील महाराज हळदी करवीर यांचे कीर्तन पार पडले. यानंतर बारा वाजता जन्मकाळ सोहळा पार पडला. यानंतर उपस्थित महिलांनी पाळणा गायिला. संध्याकाळी भजन सोहळा झाला. यावेळी सुंठवडा आणि लाडूचे वाटप करण्यात आले.
शहरातील राम भक्त आणि मुरगुड उपखंड मधील सर्व भक्तांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते. सकाळपासूनच प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी भावीक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी श्रीराम मंदिर संयोजन समिती आणि भक्त मंडळी यांनी नवीन श्रीराम मंदिराचा संकल्प केला येत्या वर्षभरात नवीन मंदिर उभारण्याचे उद्दिष्ट ठेवूनच कार्य करायचे असा संकल्प यावेळी भक्तांनी सोडला या सोहळ्याची नियोजन मंदिराचे पुजारी अनुबोध गाडगीळ, शिवभक्त सर्जेराव भाट, तानाजी भराडे, प्रकाश परिशवड, शिवाजी चौगले, संकेत शहा, प्रफुल कांबळे, नामदेव भराडे, आनंदा बैलकर, जगदीश गुरव. आनंदा रामाने धनंजय सूर्यवंशी.अमोल मेटकर. विनायक मेटकर अमर सुतार महेश कुलकर्णी यावेळी रामभक्त व शिवभक्त उपस्थित होते
----------------

