खाजगी प्राथमिक शिक्षक सेवा सहकारी पतसंस्थेकडून UPSC , MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान

Kolhapur news
By -

 

                     



            कोल्हापूर न्यूज नेटवर्क 


       

पतसंस्थेच्या सभासदांच्या मुलांनी UPSC,,MPSC स्पर्धा परीक्षेमध्ये उज्ज्वल  यश संपादन केल्याबद्दल विद्यार्थी सन्मान सोहळा " गुढी पाडव्याच्या दिनी खाजगी प्राथमिक शिक्षक सेवा सहकारी पतसंस्थेच्या सभागृहामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला . या समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक भरत रसाळे होते. 


           यूपीएससी -सीडीएस परीक्षेत लेफ्टनंट - क्लास वन ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल प्रांजल प्रकाश शिंत्रे ,युपीएससी राजपत्रित क्लास वन ऑफिसर पदी निवड झाल्याबद्दल अरुशा शरद पाटील तर SBI / Bank of Badoda मध्ये निवड झाल्याबद्दल गौरी रामराव भोळे यांचा कोल्हापुरी फेटा , सन्मान चिन्ह , बुके व शाल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला तर या कार्यकमास कौटुंबिक कारणास्तव उपस्थित राहू न शकलेली अक्षया सूर्यकांत पाटील हिची तहसील कार्यालय कोल्हापूर येथे पुरवठा निरीक्षक पदी निवड  झाल्याबद्धल भरभरून कौतुक करण्यात आले. 


अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थापक भरत रसाळे यांनी "लहरों से डर कर नौका पार नही होती । कोशिश करनेवालों की हार नही होती । " अशा  काव्यपंक्ती आमच्या पतसंस्थेच्या सभासदांच्या या मुलांनी उज्ज्वल यश संपादन करून सिद्ध केल्या आहेत . त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  पेशन्स , कान्फिंडन्स, डिटरमेशन हे गुण या तरुण पिढी कडून घेण्या सारखे आहेत . या गुणांच्या जोरावर आपल्या कर्तव्या वरील निष्ठा ढळू न देता  देश सेवेचे कार्य अविरत करावे अशी इच्छा त्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना केली .


पतसंस्थेचे चेअरमन सातापा कासार बोलताना म्हणाले की यूपीएससी, एमपीएससीत परीक्षा म्हणून उज्ज्वल यश संपादन करणे कठीण गोष्ट आहे. तरीसुद्धा आपल्या सभासदांच्या मुलांनी हे यश संपादन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले .यावेळी प्रांजल प्रकाश शिंत्रे,अरुशा शरद पाटील  गौरी रामराव भोळे  या  मुलांनी आपली यशोगाथा मनोगताद्वारे व्यक्त केली. 


यावेळी पालक सौ.शोभा शिंत्रे, सौ.अर्चना पाटील , सौ.संगीता भोळे यांनी मनोगते व्यक्त करताना आम्ही आमची मुले देश सेवे साठी अर्पण करीत आहोत असे सांगून ते आई - वडील व देशाचे नांव उज्ज्वल करतील अशा भावना व्यक्त केल्या . या वेळी राजेंद्र कोरे यांनी मनोगत व्यक्त केले . आभार संचालक महादेव डावरे यांनी मांडले तर सूत्रसंचालन संचालक मच्छिंद्र नाळे यांनी केले .यावेळी व्हाईस चेअरमन अमित परीट, मा. सचिव वसंत पाटील, संचालक सर्वस्वी सौ. वर्षाराणी वायदंडे ,सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर सल्लागार समिती सदस्य दशरथ कांबळे, आप्पासाहेब वागरे, शिवाजी भोसले , अश्विनी भोकरे यांच्या सह यशस्वी विद्यार्थ्यांचे कुटुंबीय व कार्यकारी संचालक सदाशिव साळवी ,कर्मचारी वर्ग व सभासद मोठ्या संख्येने हजर होते.









    ----------------------------------