विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर 135 वा जयंती महोत्सव नानीबाई चिखली येथे उत्साहात सुरू

Kolhapur news
By -

 

                        




          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


नानीबाई चिखली येथे विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव शनिवार दिनांक 11/04/2026 रोजी पासून सुरू झालेला आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघालेला आहे. तसेच संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.शनिवार दिनांक 11 /04 /2026 रोजी सकाळी 8.00 वा.सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सकाळी 10.00 वा. महात्मा फुले यांच्या प्रतिमेबरोबरच इतर सर्व महामानवांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.रविवार दिनांक 12 /04 /2026 रोजी सकाळी 8.00 ते संध्याकाळी 8.00 "शालेय विद्यार्थी" सलग 12 तास वाचन करून महामानवांना अभिवादन करतील व रात्री 9.00 वा."प्रबोधन पर व्याख्यान व विविध गुणदर्शनच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.सोमवार दिनांक 13 /4 /2026 रोजी सकाळी 9.00 वा."वक्तृत्व स्पर्धा" व "रांगोळी स्पर्धांचे" करण्यात आलेले आहे.


रात्री 12.00 वा."बौद्ध वंदना" घेऊन व "भीम जन्मोत्सव" साजरा होईल.मंगळवार दि.14 /4 /2026 रोजी सकाळी 9.00 वा."माणगाव ते चिखली" भीम ज्योतीचे गावात आगमन झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व त्यानंतर "गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार" मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेला आहे.दुपारी 12.00 वा.सर्व ग्रामस्थांना "प्रीती भोजन" आयोजित करण्यात आलेले आहे.सायंकाळी 5.00 वा."शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व नियोजित ग्रंथालय संकल्प मेळावा" आयोजित करण्यात आलेला आहे .


सदर प्रसंगी मार्गदर्शक म्हणून आयु.प्रज्ञावंत विद्याधर देशमुख (महाराष्ट्र लोकसेवा आयोग P.S.I. परीक्षेत मागासवर्गीयातून महाराष्ट्र राज्यात प्रथम) बुधवार दि 15/ 4 /2026 रोजी दुपारी 3.00 वाजल्यापासून भव्य मिरवणूक व अतिशबाजी होईल.तसेच 16 मे 2026 रोजी  महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका "आयु.कडूबाई खरात" यांचा "बुद्ध भीम गीतांचा" कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रम यशस्वी  करण्यामध्ये "पंचशील तरुण मंडळ व समस्त समाज बांधव" उत्साहाने प्रयत्न करत आहेत. 


          ------------------------------