कोल्हापूर न्यूज नेटवर्क
हेरले / प्रतिनिधी
नागाव, ता. हातकणंगले येथे ' भिमोत्सव '२०२६ चे आयोजन सालाबादप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी,आंबेडकर नगर नागाव यांच्या वतीने बुद्ध गार्डन येथे केले आहे.
या अंतर्गत शनिवार दि.११ एप्रिल ते मंगळवार १४ एप्रिल पर्यन्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शनिवारी ११ एप्रिल रोजी महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त रात्री ८.३० वाजता फोटोपूजन ,समाजात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन केले आहे.तसेच रात्रौ 9 वाजता विश्वनाथ कांबळे यांचा बुद्ध-भीमगीतांचा बहारदार व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल गायकवाड यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
रविवारी १२ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता खास महिलांसाठी महाराष्ट्र फेम उत्कृष्ट निवेदक राहुल कदम यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला नूतन जिल्हा परिषद सदस्या सोनाली सावंत,डॉ वर्षा सावर्डेकर,हातकणंगले पंचायत समिती च्या सभापती अश्विनी बिरांजे,पंचायत समिती सदस्या कमल कौंदाडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सायंकाळी ७ वाजता नूतन जिल्हापरिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार अशोकराव माने,गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. सुजित मिणचेकर,माजी आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार राजीव आवळे ,हातकणंगले पंचायत समिती उपसभापती संतोष कांबळे,जिल्हापरिषद सदस्य आतिश शिंगे,राहुल आवळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
त्यानंतर रात्री 8 वाजता सर्व नागरिकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे.सोमवारी दि १३ एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता लहान मुलामुलींसाठी विविध फनिगेम्स,चित्रकला,प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
मंगळवार दि १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी 9 वाजता ध्वजारोहण, महापुरुषांचे प्रतिमापूजन, विद्यार्थ्यांची भाषणे,विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आदि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.या कार्यक्रमाला नूतन जिल्हापरिषद सदस्य सलीम महात व नूतन पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच सायंकाळी 5 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार आहे.
तरी या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक आयु विजय बाचणे, दयासागर कांबळे, विवेक नागावकर,सुकुमार कांबळे,जयंती कमिटी अध्यक्ष प्रणित कांबळे ,उपाध्यक्ष प्रतिक कांबळे, खजिनदार दिपक कोरी, सेक्रेटरी अक्षय कांबळे यांनी केले आहे.
-----------------------------

