पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

Kolhapur news
By -

 

                      


             कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

   

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मुरगूड येथील शिवतीर्थ येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुरगूड शहरातील नागरिक, धनगर समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या प्रारंभी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या सामाजिक, धार्मिक व लोककल्याणकारी कार्याचा गौरव करण्यात आला. अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श कार्याचा वारसा जपण्याचे आवाहन केले.


कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज व मुरगूड शहरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आले. जयंतीनिमित्त उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.शिवभक्त मुरगूड आणि धनगर समाज मुरगूड यांनी या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.





            -------------------------