आमदार खाडे यांच्याकडून बाळूमामा देवालयास ॲम्बुलन्स अर्पण

Kolhapur news
By -

 

             


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


     

सांगलीचे भाजप आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडून बाळूमामा देवालयास मारुती इको कंपनीची अंदाजे साडेसहा लाख रुपये किमतीची ॲम्बुलन्स अर्पण करण्यात आली. जनसेवा हीच ईश्वर सेवा हे वृत्त जोपासून आमदार खाडे यांनी केलेले हे कार्य कौतुकास्पदच असल्याची चर्चा उपस्थित भक्तामध्ये होत होती. 


    काही दिवसांपूर्वी आमदार खाडे बाळूमामा मंदिरास भेट देऊन दर्शन घेण्यासाठी आले होते. त्यावेळी येथील ॲम्बुलन्स बंद असल्याचे त्यांच्या कानावर आले. त्यावेळी त्यांनी आपण या देवालयास ॲम्बुलन्स प्रदान करण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यासोबत नुकताच देवालय समितीने ॲम्बुलन्स सेवा फ्री हा घेतलेला निर्णय त्यांना आवडल्यामुळे त्यांनी तात्काळ सहकुटुंब येऊन ॲम्बुलन्स प्रदान केली. यावेळी देवस्थान समितीचे मानधन अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांच्या हस्ते आमदार खाडे यांचा देवस्थान समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. 


बाळूमामा देवालयास ॲम्बुलन्स अर्पण करण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे गौरव उद्गार धैर्यशील भोसले यांनी यावेळी काढले यावेळी देवालयाचे ट्रस्टी दिनकरराव कांबळे, दिलीप पाटील, रावसाहेब कोणकेरी, संदीप मगदूम दत्तात्रय पाटील, यशवंतराव पाटील संभाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आभार ट्रस्टी दिलीप पाटील यांनी मांनले.


                 -------------------------