मुरगूडच्या घरफाळ्यात ५% वाढीस मंजूरी : सर्वसाधारण सभेतील २५ विषयांनाही मंजूरी

Kolhapur news
By -

 

                  


            

               कोल्हापूर न्यूज नेटवर्क  

   


 मुरगूड नगरपरिषद हद्दीतील सर्व मालमत्तांच्या करपात्र मुल्यात ५ % वाढ करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . तसेच अवचितवाडी येथील उपराळा तलावाची उंची दोन मीटरने वाढवून सायफन पद्धतीने  मुरगूडला स्वच्छ पाणी द्यावे . त्यासाठीचा प्रस्ताव तयार करून त्याचा तातडीने पाठपुरावा करण्यास सभागृहाने मंजूरी दिली . सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ सुहासिनीदेवी पाटील होत्या . 



           सभेत आयत्या वेळच्या विषयात नगरपरिषदेची प्राथमिक शाळा सुरू करावी असा ठराव विजय रांजिगरे यांनी ,  सुर्यवंशी कॉलनी बॅडमिंटन हॉल समोरील रिकाम्या जागेत विरंगुळा केंद्र व ओपन जीम करावी असा ठराव अनिल राऊत यांनी, खुले नाट्यगृहात विश्वनाथराव पाटील खुले नाट्यगृह अशी कमान करण्यात यावी असा ठराव राजू आमते यांनी , रस्ता करताना पाण्यासाठी जनतेला वेठीस धरू नका असा ठराव सत्यजित पाटील यांनी , मुरगूडात प्रवेश करणाऱ्या चार रस्त्यावरील खड्डे तातडीने मुजवावेत असा ठराव सुनील मंडलिक यांनी, कापशी रोडवरील विजेच्या खांबावर जादा वॅटचे बल्ब बसवावेत असा ठराव सुरेखा लोकरे यांनी तर रस्ता अतिक्रमणातील गाळेधारकांना गाळे द्यावेत असा ठराव रणजीत भारमल यांनी मांडला .  याबरोबरच विषय पत्रिकेवरील २५ विषयांना सभागृहात मान्यता देण्यात आली .



             यावेळी उपनगराध्यक्षा रेखाताई मांगले , मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांच्यासह गटनेते सुहास खराडे ,शिवाजी चौगले , सत्यजितसिंह पाटील , सुनील रणवरे, अनिल राऊत, राहुल शिंदे ,सुनील मंडलिक , बजरंग सोनुले , विजय राजगिरे ,राजू आमते ,रणजीत भारमल, सौ गीतांजली आंगज , सौ .सुरेखा लोकरे, सौ.सुजाता पुजारी , सौ.वैशाली गोधडे, श्रीमती नकेलीन फर्नांडिस, श्रीमती संगीता चौगले , सौ. संजीवनी कांबळे , सौ. विजयमाला शिंदे , सौ. संध्या पाटील, यांनी चर्चेत सहभाग घेतला .यावेळी कार्यालयीन अधिक्षक स्नेहल नरके यांच्या मार्गदर्शनाखालील पदाधिकाऱ्यांनी सभागृहाला प्रशासकीय माहिती पुरवली . सभेत विषयांचे वाचन रणजीत निंबाळकर यांनी केले. 



       -------------------------