मुरगूड घरफळा वाढीस नागरिकांचा सक्त विरोध. नगरपालिकेस निवेदन सादर.

Kolhapur news
By -

 

             


        

             कोल्हापूर न्यूज नेटवर्क   



 मुरगुड येथील पाच टक्के घर पाळा वाढीस नागरिकांनी सक्त विरोध केला आहे.यापूर्वी प्रशासकीय काळामध्ये 20 टक्के घर फाळा वाढ झालेली आहे. त्यावेळी कोणालाही विचारण्यात आलेले नव्हते.ते ओझे अजूनही नागरिक सहन करत आहेत.आणखी पुन्हा जर फाळा वाढला तर जीवन जगणे अश्यक्य होईल. मुरगूड नगर परिषद ही क  वर्गातील आहे. बहुतेक नागरिक हे शेती व्यवसाय करतात. उत्पन्नाचे फार मोठे साधन नाही. अशावेळी त्यांना घर फाळा व भाडे वाढ होणेहे अन्याय कारक आहे.वाढीव फाळा कोणी भरला असेल तर तो त्यांना परत करण्यात यावा.



निवेदनावर  सर्जेराव भाट,ओंकार पोतदार, राजेंद्र चव्हाण,सुरेश शिंदे, निवास कुंभार, गोविंदा पाटील, सुशांत मांगोरे, विठ्ठल  बोते,अमर इंदुलकर, बाळासो सूर्यवंशी, जयसिंगराव भोसले, संदीप भारमल, ऍंथोनी बारदेसकर यांच्यासह इतर नागरिकांच्या सह्या आहेत. 


              ------------------------