सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून नागरिकांकडून पैशाची मागणी

Kolhapur news
By -

 



      सोलापूर : सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांच्या नावाचा, पदाचा आणि छायाचित्राचा गैरवापर करून व्हिएतनाम व थायलंडमधून बनावट सोशल मीडिया खाते तयार करत नागरिकांची दिशाभूल करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांच्या बनावट सोशल मीडिया खात्यावरून काही व्यक्तींकडे पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर, त्यांनी स्वतः सायबर सेलकडे याबाबत तक्रार दाखल केली असून पोलिसांचा तपास सुरू आहे. यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांच्याकडून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नागरिकांकडे अशी कोणतीही आर्थिक मागणी केली जात नाही. 


त्यामुळे या बनावट खात्यावरून येणाऱ्या संदेशांना नागरिकांनी बळी पडून स्वतःची फसवणूक करून घेऊ नये आणि अशा कोणत्याही संशयास्पद प्रकारांची त्वरित माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.


                 -----------------------