CTET परीक्षेसाठी कोल्हापुरात केंद्र द्यावे ; भरत रसाळे यांची केंद्रीय शिक्षण बोर्डाकडे मागणी

Kolhapur news
By -

 

                   


                  कोल्हापूर न्यूज नेटवर्क


    सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या CTET परीक्षेसाठी कोल्हापूरमध्ये केंद्र द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाकडे केली आहे . याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डांच्या CTET युनीटचे संचालक डॉ .जितेंद्रकुमार यादव यांना दिले .


समितीचे राज्यध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,केंद्राची CTET परीक्षा सप्टेंबर 2026 मध्ये घेण्यात येत आहेत .या परीक्षेसाठी महाराष्ट्र मध्ये मुंबई , नाशिक ,अमरावती , नागपूर अशा ठिकणीच परीक्षा केंद्रे दिलेली आहेत .पश्चिम महाराष्ट्रासाठी या परीक्षेसाठी एकही केंद्र नाही . त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासाठी म्हणून कोल्हापूर हे केंद्र देण्यात यावे . त्यामुळे सोलापूर ,सातारा ' सांगली ,कोल्हापूर  ,रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील परीक्षार्थींची  मोठी सोय होणार आहे .सन 2025 मधील CTET परीक्षेसाठी मुंबई येथेच केंद्र होते .एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील चाळीस हजार शिक्षक व परीक्षार्थी या परीक्षेसाठी मुंबईला गेले होते . या सर्वांची निवास व्यवस्था न झालेने व एवढ्या लांब अंतरावर जाऊन परीक्षा दिल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले होते .त्यामुळे येत्या सप्टेंबर 2026 मध्ये होणाऱ्या केंद्राच्या CTET परीक्षेसाठी कोल्हापुरमध्ये केंद्र द्यावे व व पश्चिम महाराष्ट्रातील परीक्षार्थांची  सोय करावी .अशी मागणी CTET चे संचालक जितेंद्र कुमार यादव यांच्याकडे केली आहे . याबाबतचा मेल पाठवलेला असून त्यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून हे केंद्र मंजूर व्हावे यासाठी प्रयत्न चालू असल्याचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी म्हटले आहे .


           ---------------------------